Wakad Crime : महिलेच्या विनयभंग केल्याप्रकरणी डॉक्टरवर गुन्हा

0

एमपीसी न्यूज – महिलेशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग करणा-या एका डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 7 नोव्हेंबर रोजी रात्री डांगे चौकातील अमृता मॅटर्निटी हॉस्पिटल येथे घडला.

डॉ. विजय कुमार मेटे (वय 40, रा. अमृता मॅटर्निटी हॉस्पिटल, डांगे चौक, वाकड) असे गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरचे नाव आहे. याबाबत पीडित महिलेने मंगळवारी (दि. 10) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डांगे चौक येथील अमृता मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये आरोपी हा डॉक्टर आहे. त्याने 7 नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास पीडित महिलेचा कन्सलटंट रूममध्ये हात धरून तिच्याशी गैरवर्तन केले. महिलेच्या विनयभंग प्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III