Wakad Crime : मोठमोठ्याने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी महिलेवर गुन्हा

एमपीसी न्यूज – सोसायटीच्या आवारात मोठमोठ्याने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सोमवारी (दि. 9) सकाळी पावणेदहा वाजता धनगरबाबा मंदिरासमोर थेरगाव येथे घडला.

कौशल्या गोलाणी (वय अंदाजे 45, रा. संत ज्ञानेश्वर हाऊसिंग सोसायटी, नखातेनगर, धनगरबाबा मंदिरासमोर, थेरगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. डॉ. सौरभ भिवा तनपुरे (वय 24, रा. संत ज्ञानेश्वर हाऊसिंग सोसायटी, नखातेनगर, धनगरबाबा मंदिरासमोर, थेरगाव) यांनी याबाबत मंगळवारी (दि. 10) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी डॉ. तनपुरे त्यांच्या घराच्या गॅलरीमधून दिवाळीसाठी आकाश कंदील आणि लाईटच्या माळा बांधत होते. त्यावेळी काहीही कारण नसताना आरोपी कौशल्या हिने सोसायटीच्या सार्वजनिक रोडवर येऊन मोठमोठ्याने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली.

फिर्यादी यांच्याकडे पाहून कौशल्या हिने शिवीगाळ केली. तसेच कॉलनीमधील महिलांना शिवीगाळ करत एकेकाला दाखवतेच अशी धमकी दिली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.