मंगळवार, डिसेंबर 6, 2022

Wakad crime : भाईची अजब दादागिरी, ओळखत नाही म्हणून मारहाण करत लुटले

एमपीसी न्यूज : तुम्ही मला ओळखता का नाही म्हणताच मारहाण करत दोघांना लुटल्याचा प्रकार काळेवाडी येथील रहाटणी फाटा परिसरात शनिवारी (दि.24) मध्य रात्री सव्वा बारा वाजता झाला. (Wakad crime) त्या तथाकथीत भाईला वाकड पोलिसांनी मात्र गजाआड केले आहे.

विकी रामप्रसाद मल (वय 42 रा.थेरगाव) असे अटक आरोपीचे नाव आहे. तर संदेश रमेश गायकवाड (वय 30 रा. थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या मित्रासोबत रहाटणी फाट्यावरील राजधानी हॉटेल जवळ थांबले होते. यावेळी आरोपी तेथे आला व त्याने सिगारेट आहे का विचारले, तसेच फिर्यादी यांना तुम्ही कुठले आहात यावर फिर्यादी यांनी आम्ही इथलेच असे सांगितले.(Wakad crime) तुम्ही इथले असाल तर मला ओळखता का यावर फिर्यादींनी नाही असे उत्तर दिले. तुम्ही इथलेच आहेत तर तुम्ही मला ओळखत नाही? मी या एरियाचा भाई आहे विकी मल भाई असे बोलून त्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली व लाकडी फळीन आणी लाथा बुक्क्याने मारहाण करून फिर्यादी व त्यांच्या मित्राजवळील 9 हजार रुपयांचे दोन मोबाईल हिसकावून घेतले.

Chakan police instruction : नवरात्र उत्सवासाठी पोलिसांकडून मार्गदर्शक सूचना

याप्रकरणी तक्रार करताच वाकड पोलिसांनी या विकीभाईला बेड्या ठोकल्या असून संबंधीत भाई मजुरी करून पोट भरत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.(Wakad crime) या प्रकरणाचा पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत.

Latest news
Related news