Wakad Crime : हॉटेलमधील नोकराकडून 96 हजारांचा अपहार

एमपीसी न्यूज – हॉटेलमध्ये काम करणा-या नोकराने 96 हजार 650 रुपयांचा मालकाच्या परस्पर अपहार केला. ही घटना 15 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट 2020 या कालावधीत रो एस आर रूम्स अंड हॉटेल, भूमकर चौक, वाकड येथे घडली.

राहुल दत्ता मिसाळ (वय 27, पत्ता माहिती नाही) असे गुन्हा दाखल झालेल्या नोकराचे नाव आहे. याबाबत श्रीकांत दिगंबर कुलकर्णी (वय 65, रा. ब्रांदा, मुंबई) यांनी शनिवारी (दि. 24) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नोकर राहुल याने हॉटेल मधील ग्राहकांकडून गुगल पे द्वारे घेतलेले तसेच काउंटरमध्ये ठेवलेले 10 हजार रुपये, दोन जणांच्या पगाराचे चार हजार रुपये, गार्बेज एजन्सी आणि गोदरेज लॉकच्या दुकानदाराला देण्यासाठी ठेवलेले प्रत्येकी साडेतीन हजार असे एकूण 96 हजार 650 रुपये घेऊन आरोपी राहुल गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.