Wakad Crime : बनावट कागदपत्रांच्या आधारे दस्त नोंदणी करून घेतल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा

एमपीसी न्यूज – बनावट कागदपत्रांच्या आधारे दस्त नोंदणी करून एक सदनिका पत्नीच्या तर दुसरी सदनिका मुलाच्या नावे करून मूळ सदनिका मालकांची फसवणूक केली. ही घटना ताथवडे येथे घडली असून याबाबत वाकड पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिल्या गुन्ह्यात  चिंचवड येथील 52 वर्षीय महिलेने  फिर्याद दिली आहे. त्यानुसार, विलास गोपाळ डोंगरे (रा. ताथवडे, मूळ रा. डोंबिवली (पूर्व) ठाणे), वंदना विलास डोंगरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी विलास आणि फिर्यादी यांनी संगनमत करून पूर्वी तयार केलेले खोटे वीजबिल खरे असल्याचे भासवून त्याआधारे दुय्यम निबंधक कार्यालय, हवेली येथे दस्त नोंदणी करून फिर्यादी यांच्या नावारील सदनिका फिर्यादी यांच्या नावावर करून घेतली. त्याबाबत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुस-या गुन्ह्यात  ताथवडे येथील 40 वर्षीय तरुणाने   फिर्याद दिली आहे. त्यानुसार, विलास गोपाळ डोंगरे, सुयोग विलास डोंगरे, अमेय विलास डोंगरे, पल्लवी सुयोग डोंगरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींनी संगनमत करून पूर्वी तयार केलेले खोटे वीजबिल खरे असल्याचे भासवून त्याआधारे सह दुय्यम निबंधक कार्यालय, पुणे येथे फिर्यादी यांच्या नावावरील सदनिका सुयोग डोंगरे यांच्या नावावर बक्षिसपत्र तयार करून घेतले. याद्वारे फिर्यादी यांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.