-MPC-TOP-MOST-BANNER-I

Wakad Crime: दागिने, पैशांची मागणी करत विवाहितेचा छळ; विवाहितेच्या माहेरच्या लोकांना मारहाण

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – सोन्याचे दागिने आणि पाच लाख रुपये माहेरहून घेऊन येण्याची वारंवार मागणी करून सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ केला. तसेच विवाहितेच्या भावाला, आईला आणि अन्य एकाला सासरच्या लोकांनी मारहाण केली. ही घटना जगताप डेअरी चौक येथे घडली.

अजय साहेबराव भालेकर (वय 41), साहेबराव दामे भालेकर (वय 75), नलिनी साहेबराव भालेकर (वय 60), वैशाली अमित अग्रवाल, अमित अग्रवाल (सर्व रा. जगताप डेअरी चौक) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पीडित विवाहितेने मंगळवारी (दि. 3) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी विवाहितेकडे माहेरहून सोन्याचे दागिने आणि पाच लाख रुपये घेऊन येण्याची मागणी केली. त्यावरून तिला शिवीगाळ, मारहाण व धमकी देत शारीरिक व मानसिक छळ केला.

पती अजय याने विवाहितेला तिच्या वैवाहिक हक्कांपासून वंचित ठेवले. 7 जून 2020 रोजी विवाहितेच्या भावाला पती अजय, सासरे साहेबराव यांनी शिवीगाळ व मारहाण केली. सासू नलिनी हिने विवाहितेच्या भावाला चावा घेऊन जखमी केले. सासू नलिनी आणि नणंद वैशाली यांनी विवाहितेच्या आईला मारहाण केली. विवाहीतेसोबत आलेल्या एका नातेवाईकाला आरोपी अमित याने मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.