Wakad Crime : सोन्याचे दागिने आणि मोपेड दुचाकीची मागणी करत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज – विवाहितेकडे सोन्याचे दागिने आणि मोपेड दुचाकीची मागणी केली. विवाहितेने ते देण्यास नकार दिल्याने तिचा छळ केला. अशी फिर्याद वाकड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

रितेश रतन धोत्रे (वय 28), रतन भिमाजी धोत्रे (वय 54), शोभा रतन धोत्रे (वय 48), रीतुल रतन धोत्रे (वय 21, सर्व रा. कल्याणीनगर, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत 24 वर्षीय विवाहितेने बुधवारी (दि. 28) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी विवाहीतेकडे वारंवार सोन्याचे दागिने आणि अ‍ॅक्टिवा दुचाकीची मागणी केली. विवाहितेने ते देण्यास नकार दिला. यावरून तिला शिवीगाळ, मारहाण व धमकी देऊन तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. तिला क्रूर वागणूक दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III