Wakad Crime News : जीवे मारण्याची धमकी देत बेकायदेशीररीत्या शाळेसमोरील 14 झाडे तोडली; सात जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – शाळेसमोरील 14 झाडे शाळेच्या आणि महापालिकेच्या परवानगीशिवाय तोडली याबाबत सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (दि. 17) दुपारी साडेबारा वाजता ताथवडे येथील राजीव बिझनेस स्कूल व दि अकेडमी स्कूल समोर घडली.

राजेश वालिया व त्यांचे सहा कामगार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अमित भागवत पवार (वय 36, रा. कोथरूड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताथवडे येथे ग्रामोदय ट्रस्टची राजीव बिझनेस स्कूल व दि अकेडमी स्कूल आहे. या शाळेच्या गेटसमोर असलेली 14 बिट जातीची झाडे आरोपींनी शाळेच्या आणि महापालिकेच्या परवानगीशिवाय तोडली. झाडे कापत असताना फिर्यादी अडविण्यासाठी गेले असता आरोपींनी त्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.