Wakad : लग्नातील मानपानावरून विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज – लग्नात केलेल्या मानपानावरून सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला. हा प्रकार पाटीलनगर थेरगाव येथे 15 फेब्रुवारी 2014 ते 31 ऑक्टोबर 2018 दरम्यान घडला.

याप्रकरणी 29 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पती समीर रमेश मेंढे, सासू शशिकला मेंढे, दीर तुषार मेंढे (सर्व रा. संजीवनी अपार्टमेंट, दगडू पाटील नगर, थेरगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचा समीर याच्यासोबत 15 फेब्रुवारी 2014 रोजी विवाह झाला. विवाहामध्ये विवाहितेच्या आई-वडिलांनी व्यवस्थित मानपान दिला नाही. तसेच काही वस्तू दिल्या नाहीत, यावरून पती समीर, सासू आणि दीर मिळून त्यांना मानसिक आणि शारीरिक त्रास देऊ लागले. तसेच विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर पती समीर याने स्वतःच्या जीवाचे बरे-वाईट करून घेण्याचीही धमकी दिली. या त्रासाला कंटाळून विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक तानाजी भोगम तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.