Wakad Crime News : विश्वासघात करून किचनचा बेकायदेशीरपणे ताबा घेतल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – भाडेकरूने दिलेले भाड्याचे पैसे मध्यस्थ व्यक्तीने स्वतः वापरून मालकाला पैसे न देता विश्वासघात केला. पैसे न मिळाल्याने मालकाने दुकानाला भाडेकरूच्या कुलुपावरून कुलूप लावत किचनचा बेकायदेशीरपणे ताबा घेतला. याप्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 23 ऑगस्ट रोजी रात्री ईस्टन स्टेशन, आशीर्वाद कॉलनी, रहाटणी येथे घडली.

तुषार सूर्यकांत काळे (रा. साईनाथ नगर, पिंपळे गुरव), प्रितेश सूरी (रा. साईनीक फार्मस, न्यू दिल्ली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी आरकट कृष्णमूर्ती पलानी (वय 51, रा. चिंचवड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ईस्टन स्टेशन, आशीर्वाद कॉलनी, रहाटणी येथे किचन सेंटर गाळा क्रमांक तीन हा फिर्यादी यांच्या ताब्यात आहे. फिर्यादी यांनी गाळ्याचे भाडे क्लाऊड रिटेल सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे अ‍ॅथोराइज सिग्नेचरचे अधिकारी प्रितेश सूरी यांना विश्वासाने दिले. ते सूरी यांनी तुषार काळे यांना न देता स्वतःसाठी वापरून फिर्यादी यांचा विश्वासघात केला. सदर गाळा फिर्यादी यांच्या ताब्यात असताना तुषार काळे यांनी फिर्यादी यांनी लावलेल्या कुलुपावरून दुसरे कुलूप लावून किचन सेंटरचा ताबा घेतला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.