Wakad crime News : काळाखडक झोपडपट्टीमध्ये सव्वा किलो गांजा पकडला

पोलिसांनी परिसरात सापळा रचून सुशीला हिला गांजासह अटक केली.

एमपीसी न्यूज – वाकड पोलिसांनी काळा खडक झोपडपट्टी येथे एक किलो 200 ग्राम वजनाचा गांजा पकडला आहे. याप्रकरणी एका महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई पोलिसांनी रविवारी (दि. 13) रात्री दहा वाजता केली.

सुशीला देसाई लष्करे (वय 35, रा. काळाखडक झोपडपट्टी, वाकड) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक कीर्ती रमेश घार्गे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुशीला हिने तिच्याकडे एक किलो 200 ग्राम वजनाचा 24 हजार रुपये किमतीचा गांजा विक्री करण्यासाठी बाळगला. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली.

पोलिसांनी परिसरात सापळा रचून सुशीला हिला गांजासह अटक केली.  वाकड पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.