Wakad crime News : जेवणातून गर्भपाताच्या गोळ्या देऊन महिलेचा गर्भपात

याप्रकरणी पीडित विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

एमपीसी न्यूज – महिलेच्या नकळत तिच्या जेवणात गर्भपाताच्या गोळ्या टाकून तिचा गर्भपात केला. तसेच माहेरहून पैसे आणण्यासाठी तिचा मानसिक व शारीरिक छळ केल्याचा गुन्हा वाकड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

पती शेखर रामदास वाघुले (वय 30, रा. रहाटणी. मूळ रा. वारूळवाडी, नारायणगाव, ता. जुन्नर), सासरे रामदास वाघुले, सासू आशा वाघुले (दोघे रा. वारूळवाडी, नारायणगाव, ता. जुन्नर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी पीडित विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून विवाहितेला शारीरिक व मानसिक त्रास देऊन माहेरहून पैसे आणण्याची वेळोवेळी मागणी केली. कौटुंबिक कारणांवरून मारहाण व शिवीगाळ केली.

फिर्यादी विवाहिता गरोदर असताना आरोपी पती शेखर याने विवाहितेच्या नकळत तिच्या जेवणात गर्भपाताच्या गोळ्या मिक्स केल्या. त्याद्वारे तिचा गर्भपात केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.