Wakad Crime News : लग्न मोडल्यानंतर तरुणीच्या होणाऱ्या पतीला पाठवला बदनामीकारक मेसेज

एमपीसी न्यूज – तरुणीसोबत जमलेले लग्न मोडले. त्यानंतरही तरुणाने संबंधित तरुणीचा वारंवार पाठलाग केला. तरुणीशी भेटण्याची इच्छा व्यक्त करत तिला शिवीगाळ केली. तसेच तरुणीच्या होणा-या पतीला इंस्टाग्रामवर तरुणीबाबत बदनामीकारक मेसेज पाठवले.

याबाबत तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 12 डिसेंबर 2017 ते 9 फेब्रुवारी 2021 या कालावधीत घडला आहे.

बॉनी पिल्ले (रा. कथे कॉलनी, देवळाली कॅम्प, नाशिक) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत 24 वर्षीय तरुणीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बॉनी आणि फिर्यादी तरुणी यांचे सुरुवातीला लग्न जमले होते. जमलेले लग्न काही कारणास्तव मोडले. त्यानंतर बॉनीला भेटण्यास आणि संपर्क करण्यास तरुणीच्या घरच्यांनी मनाई केली.

तरुणीची इच्छा नसताना देखील बॉनी याने तिचा पाठलाग केला. तरुणीने त्याला भेटण्यास नकार दिला असता बॉनीने तरुणीला आणि तिच्या घरच्यांना शिवीगाळ करून धमकी दिली.

दरम्यान तरुणीचे लग्न दुस-या तरुणासोबत जमले. बॉनी याने तरुणीच्या होणा-या पतीला इंस्टाग्रामवर तरुणीबद्दल बदनामीकारक मेसेज पाठवले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.