Wakad Crime News : अष्टविनायक कॉलनीत एटीएम फोडण्याचा प्रयत्न; अल्पवयीन मुलगा पोलिसांच्या ताब्यात

एमपीसी न्यूज – एका अल्पवयीन मुलाने अष्टविनायक कॉलनी, वाकड येथे एटीएम फोडून पैसे पळवण्याचा प्रयत्न केला. एटीएम फोडत असल्याची बाब पोलिसांच्या निदर्शनास आल्याने पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. हा प्रकार सोमवारी (दि. 8) पहाटे घडला.

गुन्हे शाखा युनिट चारचे सहाय्यक पोलीस फौजदार धर्मराज आवटे यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड परिसरात गुन्हे शाखा युनिट चारचे पोलीस गस्त घालत होते. सोमवारी पहाटे सव्वा दोन वाजताच्या सुमारास अष्टविनायक कॉलनी येथील पंडित पेट्रोलपंपासमोर असलेल्या हिताची बँकेच्या एटीएम मध्ये रोकड पळवण्याचा प्रयत्न होत असल्याची बाब पोलिसांच्या निदर्शनास आली.

पोलिसांनी एटीएम सेंटरकडे धाव घेतली असता एक अल्पवयीन मुलगा एटीएमच्या बाहेरील बाजूचा पत्रा उचकटून आतील पैशांचे ट्रे उचकटण्याचा प्रयत्न करीत होता. पोलिसांनी मुलाला ताब्यात घेऊन त्याचा एटीएम मधील रोकड पळवण्याचा डाव उधळून लावला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.