Wakad Crime News : भूमकर चौकातील HDFC चे एटीएम फोडण्याचा प्रयत्न, आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज – भूमकर चौक, वाकड येथील HDFC बॅंकेचे एटीएम फोडून पैसे चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. रविवारी (दि.30) रात्री दीडच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.

नंदु करम थापा (वय 35, रा. नेपाळ) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी संदीप हिरासिंग जाधव (वय 35, रा. पिंपळे सौदागर, पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपी थापा याने HDFC बॅंकेचे एटीएम फोडून पैसे चोरण्याचा प्रयत्न केला. दरम्यान आरोपीला अटक करण्यात आली असून अधिक तपास पोलीस हवालदार उत्तेकर करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.