Wakad Crime News : जागरूक नागरिकांनी दोन चोरट्यांना पकडून दिले पोलिसांच्या ताब्यात

एमपीसी न्यूज – सध्या शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे झाले आहे. काळेवाडी येथे चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना सतर्क नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले.

तुकाराम नढे कॉलनी येथे आज (बुधवारी, दि. 9) पहाटेच्या सुमारास कडी कोयंडा उचकटून घरात प्रवेश करुन घरातील ऐवज, पैसे, मोबाईल फोन, मौल्यवान वस्तू चोरी करणाऱ्या टोळीतील दोन चोरट्यांना नागरिकांनी रंगेहाथ पकडले. त्यानंतर वाकड पोलिसांना बोलावून चोरट्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले.

सामाजिक कार्यकर्ता हर्षल वाघमारे, गणेश खरात, बालाजी लोहार, आबा गंगावणे, राहुल शिर्के, अनंत कुलकर्णी, सचिन लिमकर आदींनी या चोरट्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले.

मागील काही दिवसात काळेवाडी व वाकड परिसरात मौल्यवान वस्तू, ऐवज घरातून चोरी झाला असल्यास नागरिकांनी वाकड पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.