Wakad Crime News : बँक खात्याची गोपनीय माहिती हॅक करून 38 लाखांची फसवणूक
एमपीसी न्यूज – एका ज्येष्ठ नागरिकाच्या बँक खात्याचा पासवर्ड व आयडी हॅक करून त्याद्वारे 38 लाख चार हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. ही घटना 15 जुलै रोजी काळेवाडी फाटा येथे घडली.
सुबोध चंद्रकांत कोरडे (वय 61, रा. काळेवाडी फाटा, वाकड) यांनी शनिवारी (दि. 17) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुभोमोय बिश्वास, समीर तमंग आणि आलोक पाल (पुर्ण नाव पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 जुलै रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास आरोपींनी आपसात संगनमत करून इंटरनेटचा वापर करून फिर्यादी कोरडे यांच्या एचडीएफसी बँक अकाउंटचा आयडी आणि पासवर्ड हॅक केला. त्याद्वारे कोरडे यांच्या बँक खात्यातील 38 लाख चार हजारांचे परस्पर ऑनलाइन ट्रांजेक्शन करून फिर्यादी यांची फसवणूक केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.