Wakad Crime News : शासनाचा कर न भरता सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थांची विक्री केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा; एकास अटक

एमपीसी न्यूज – शासनाचा कोणताही कर न भरता प्रतिबंधित केलेली तीन लाख 94 हजार 615 रुपयांची सिगारेट व तंबाकूजन्य पोलिसांनी जप्त केले. गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने पवारनगर, थेरगाव येथे 31 जुलै रोजी ही कारवाई केली.

गणेश सुवालाल गांधी (वय 32, रा. पवारनगर, थेरगाव) आणि मयुर शिरीषकुमार अग्रवाल (रा. रास्ता पेठ, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. गुन्हे शाखा युनिट चारचे पोलीस हवालदार तुषार अशोक शेटे यांनी रविवारी (दि. 1) याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी गांधी याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शासनाने प्रतिबंधित केलेली सिगारेट आणि तंबाकूजन्य पदार्थ आरोपीकडे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा घालून तीन लाख 94 हजार 615 रुपयांचा ऐवज जप्त केला. आरोपी गांधी याने शासनाचा कोणताही कर न भरता फसवणूक केली. वाकड पोलीस तपास करीत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.