_MPC_DIR_MPU_III

Wakad Crime News : कुंटणखाना चालविणा-या दोन महिलांसह दलालास अटक ; सहा महिलांची सुटका

'झीरो टॉलरन्स' मोहीमेतंर्गत वाकड पोलीसांची धडक कारवाई

एमपीसी न्यूज – मोबाईलद्वारे चॅटिंग करुन लोकांना वेश्यागमनासाठी मुली पुरवून वेश्याव्यवसाय करणा-या दोन महिला व एक दलालास वाकड पोलीसांनी अटक केली आहे. आज शनिवारी (दि.12) दुपारी बाराच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

_MPC_DIR_MPU_IV

फरजाना इस्माईल पठाण, अर्चना अजिनाथ कांबळे व दलाल सचिन अशोक खंडागळे, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक संगीता गोडे यांनी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थेरगाव पोलीस चौकीचे पोलीस कर्मचारी परिसरात पेट्रोलींग करित होते. त्यावेळेची थेरगांव येथे एका सोसायटीमध्ये दोन महिला मोबाईलद्वारे चॅटिंग करुन लोकांना वेश्यागमनासाठी मुली पुरवून वेश्याव्यवसाय करित असल्याची गुप्त माहिती मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी टिम तयार करून संबंधित ठिकाणी वेश्याव्यवसाय चालतो का, याची खात्री करण्यासाठी डमी गि-हाईक पाठवले.

_MPC_DIR_MPU_II

खात्री पटताच पोलिसांनी संबंधित फ्लॅटवर छापा टाकला. या कारवाईत फ्लॅटमध्ये एकूण सहा पीडित महिलांसह दोन आरोपी महिला व एक पुरुष आरोपी आढळून आले.

पोलिसांनी पीडित सहा महिलांची विचारपूस केली असता त्यांना पैशांची आवश्यकता असल्याने व त्यांच्या गरीबीचा गैरफायदा घेत जास्त पैशांचे आमिष दाखवून त्यांना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडल्याचे निष्पन्न झाले.

छाप्यामध्ये आरोपी व पीडित महिलांकडून एकूण मोबाईल डमी ग्राहकाकडून घेतलेले चार हजार रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अटक केलेल्या आरोपींना 14 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. तर, पीडित सहा महिलांना रेस्क्यु फाऊंडेशन, मुंढवा पुणे येथे दाखल करण्यात आले आहे.

 झीरो टॉलरन्स मोहीमेतंर्गत वाकड पोलिसांची धडक कारवाई

नव नियुक्त पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी ज्या दिवशी पदभार स्वीकारला त्यादिवशी झिरो टॉलरन्स हीच माझी पॉलिसी असणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार वाकड पोलिसांनी ही धडक कारवाई केली.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.