Wakad Crime News : ताथवडेत घरफोडी तर पुनावळेत घरफोडीचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – जीवननगर ताथवडे येथे अज्ञात चोरट्यांनी घरोफोडी करून 46 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. तर पुनावळे येथे अज्ञात चोरट्यांनी एक घरफोडी करण्याचा प्रयत्न केला. या दोन्ही प्रकरणांमध्ये वाकड आणि हिंजवडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

निलेश शांताराम कुंभार (वय 36, रा. जीवननगर, ताथवडे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे घर रविवारी (दि. 5) सकाळी साडेआठ ते सोमवारी (दि. 6) सकाळी आठ वाजताच्या कालावधीत कुलूप लावून बंद होते. दरम्यानच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी घराचे लॅच लॉक तोडून आत प्रवेश केला. बेडरूम मधील लाकडी कपाटाच्या लॉकरमधून 43 हजार रुपये किमतीची एक तोळे सोन्याची चेन, आणि साडेतीन हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 46 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

राहुल दिलीप काटे (वय 37, रा. काटेवस्ती, पुनावळे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी काटे यांचा काटेवस्ती येथे बंगला आहे. सोमवारी (दि. 6) पहाटे सव्वादोन ते अडीच वाजताच्या सुमारास बंगला कुलूप लावून बंद असताना अज्ञात चोरट्यांनी बंगल्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी रात्रीच्या वेळी घरफोडी करण्याचा प्रयत्न केला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.