Wakad Crime News : हॉर्न वाजवल्याचा जाब विचारणाऱ्या कार चालकाला मारहाण, महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज – हॉर्न वाजवल्याचा जाब विचारणाऱ्या कार चालकाला दुचाकीवरून आलेल्या एकाने मारहाण केली. त्यानंतर कार मधील व्यक्तीच्या पत्नीसोबत गैरवर्तन करून त्यांचा विनयभंग केला. तसेच दोघा पती पत्नीला धमकावले. ही घटना मंगळवारी (दि. 26) रात्री सात वाजता भूमकर चौक, वाकड येथे घडली.

याबाबत 36 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मोपेड दुचाकी (एम एच 14 / एच एक्स 9346) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला, त्यांचे पती आणि मुलगा असे तिघेजण त्यांच्या कारमधून भूमकर चौकातून जात होते. त्यावेळी त्यांच्या कारमागून एका मोपेड दुचाकीवरून आरोपी हॉर्न वाजवत आला. रस्ता मोकळा असतानाही तो जोरजोरात हॉर्न वाजवत होता. त्यामुळे फिर्यादी यांच्या पतीने त्याला हॉर्न वाजवल्याचा जाब विचारला. त्यावरून आरोपीने फिर्यादी यांच्या पतीला शिवीगाळ केली. तसेच फिर्यादी यांच्याशी गैरवर्तन करत त्यांच्या विनयभंग केला. याप्रकरणी पोलिसात तक्रार केल्यास मारून टाकण्याची आरोपीने धमकी दिली.

वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.