Wakad Crime news: सराईत गुन्हेगार सचिन साठे टोळीवर मोका

एमपीसी न्यूज – वाकड पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार सचिन साठे टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन 1999 (मोका) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ही टोळी वाकड परिसरात वर्चस्व आणि आर्थिक फायद्यासाठी गुन्हे करत असल्याचे पोलिसांच्या अहवालात म्हटले आहे.

सचिन सोनु साठे (वय 26, रा. गणराज कॉलनी, काळेवाडी, वाकड, पुणे), किशोर ऊर्फ गुड्डया ज्ञानदेव शेलार (वय 25, रा. दुर्गा कॉर्नर बिल्डींग, साई भुषण बेकरी समोर, लिंक रोड, चिंचवड, पुणे), सीजीन फिलीप जॉर्ज, वय 26, रा. ज्योतीबा मंगल कार्यालयामागे काळेवाडी, वाकड, पुणे), रोहीत लल्लन सिंग (वय 22, रा. पवनानगर कॉलनी नं. 2, काळेवाडी, वाकड, पुणे) अशी कारवाई केलेल्या आरोपींची नावे आहेत.

वाकडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी उपायुक्त विनायक ढाकणे यांच्या मार्फत आरोपींच्या विरोधात मोका अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांच्याकडे पाठवला होता.

पीसीबी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजकुमार शिंदे, पोलीस कर्मचारी सचिन चव्हाण, पोलीस हवालदार यांनी प्रस्तावातील कागदपत्रांची छाननी करून त्रुटींची पूर्तता केली. त्यावर अपर आयुक्तांनी मोकाच्या कारवाईचा आदेश बुधवारी (दि. 2) दिला आहे. पुढील तपास वाकड विभागाचे सहाय्यक आयुक्त करीत आहेत.

आरोपींच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. आरोपींनी पूर्ववैमनस्यातून 18 वर्षीय तरुणाचा 5 जून रोजी कोयत्याने वार करून खून केला होता.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदिप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त (गुन्हे) सुधीर हिरेमठ, उपायुक्त (परिमंडळ 2) विनायक ढाकणे, सहाय्यक आयुक्त (गुन्हे 1) आर आर पाटील, सहायक आयुक्त (गुन्हे 2) श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजकुमार शिंदे, पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, पोलीस कर्मचारी सचिन चव्हाण, सुहास पाटोळे यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.