Wakad Crime News : मुदतीत फ्लॅटचा ताबा न दिल्याप्रकरणी बिल्डर विरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज – ठरलेल्या मुदतीत गृह प्रकल्पाचे काम पूर्ण करता तसेच फ्लॅटचा ताबा न देता ग्राहकाची फसवणूक केली. याबाबत बिल्डर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 18 ऑक्टोबर 2017 ते तीन जून 2021 या कालावधीत पुनावळे येथे घडला.

उमेश मनोहरराव वाकोडे (रा. आदर्शनगर, किवळे) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत नीलकंठ श्रीपतराव वाघमारे (वय 38, रा. थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वझरकर असोसिएट्स (प्रमोटर्स अँड बिल्डर्स)चे मालक/भागीदार बिल्डर यांनी त्यांच्या लक्ष्मी व्हीला या गृह प्रकल्पामध्ये एका फ्लॅटच्या खरेदी पोटी फिर्यादी यांच्याकडून 26 लाख 74 हजार रुपये घेतले. त्यानंतर दिलेल्या मुदतीत ग्रुह प्रकल्पाचे काम पूर्ण केले नाही, तसेच ठरलेल्या मुदतीत फ्लॅटचा ताबा दिला नाही. गृह प्रकल्प पूर्ण करण्यासाठी रेरा प्राधिकरणाकडे अर्ज सादर करून त्यासोबत फिर्यादी यांच्यासह इतर फ्लॅट धारकांच्या बनावट स्वाक्षरीचे संमती पत्र सादर करून फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.