Wakad Crime News : दुचाकीला बनावट नंबर प्लेट लावल्याप्रकरणी एकावर गुन्हा

एमपीसी न्यूज – दुचाकीला बनावट नंबर प्लेट लाऊन शासनाची व पोलिसांची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 28) सकाळी नऊ वाजता भूमकर चौक, वाकड येथे करण्यात आली आहे.

सुभाष नामदेव उभे (रा. शिवणे, ता. मावळ) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत हिंजवडी वाहतूक विभागाचे पोलीस हवालदार बी. आर. पावसकर यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुभाष याने त्याच्या मोपेड दुचाकीला बनावट नंबर प्लेट लावली. त्याच्या दुचाकीचा मूळ नंबर एमएच 14 / एच सी 9749 असा आहे. सुभाष याने दुचाकीला एम एच 14 / एच सी 7979 ही नंबर प्लेट लावून शासनाची व पोलिसांची फसवणूक केली.

वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.