Wakad Crime News : शस्त्राच्या धाकाने दहशत माजविणाऱ्या सात जणांवर गुन्हा; चौघांना अटक

एमपीसी न्यूज – पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून हातात कोयता नाचवत दहशत निर्माण करणाऱ्या सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ताथवडे येथे सोमवारी (दि. 10) दुपारी घडली.

पवन सिंग, महेश गोपीनाथ पवार, रोहन नानासाहेब शेवंते, तम्या पाटील, ऋषीकेश अशोक चापाले, रोहित नानासाहेब शेवंते, आसिफ दस्तगीर मुजावर (सर्व रा. ताथवडे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. अनिकेत प्रल्हाद माने (वय 20, रा. कस्पटे वस्ती, वाकड) यांनी मंगळवारी (दि. 11) याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास फिर्यादी माने हे आपल्या रघुनंदन कार्यालयाजवळील कंपनीच्या बाहेर उभे होते. त्यावेळी आरोपी आपसांत संगनमत करून फिर्यादी यांच्याकडे आले.

रविवारी (दि. 9) झालेल्या भांडणाच्या कारणावरून आरोपी महेश पवार याने आपण स्वतः मोठा भाई असल्याचे सांगत हातात कोयता नाचवत येणाऱ्या जाणाऱ्या लोकांमध्ये दहशत निर्माण करून फिर्यादी माने यांना धमकी दिली.

पोलिसांनी महेश, ऋषीकेश, रोहित, आसिफ यया चौघांना अटक केली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.