Wakad Crime News : रस्त्याचे कॉंक्रीटीकरण करताना महावितरणच्या भूमिगत वायरचे नुकसान; ठेकेदारावर गुन्हा

एमपीसी न्यूज – रस्त्याचे कॉंक्रीटीकरण करताना महावितरणच्या भूमिगत वायर आणि अन्य साहित्याचे एक लाख रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या संचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा प्रकार 31 मार्च रोजी काळाखडक ते वाकडकडे जाणा-या रस्त्यावर घडला.

_MPC_DIR_MPU_II

महावितरणचे सहाय्यक अभियंता सनी टोपे (वय 32, रा. वाकड) यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मे. एस. के. येवले अँड कंपनीच्या संचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड येथील काळा खडक ते वाकडकडे जाणा-या रस्त्याच्या कॉंक्रीटीकरणाचे काम आरोपीच्या कंपनीला देण्यात आले आहे. वेस्टर्न अव्हेन्यू सोसायटी येथे काम सुरु असताना रस्त्याच्या कामात निष्काळजीपणा झाल्याने महावितरणचे सुमारे एक लाख रुपयांच्या साहित्याचे नुकसान झाले.

याबाबत महावितरणकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.