Wakad Crime News : दुकानाचे थकलेले भाडे मागण्यावरून वाद; चार जणांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – दुकानाचे थकलेले भाडे मागण्यासाठी आलेल्या दुकान मालकाने आणि त्याच्या तीन साथीदारांनी दुकानदार महिलेशी वाद घातला. तसेच तिला जातीवाचक बोलून शिवीगाळ करत मारण्यासाठी आरोपी धावून आले. याबाबत चार जणांच्या विरोधात अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (ॲट्रॉसिटी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गिरीश भाटिया, त्याची बहीण, बहिणीचा पती आणि त्यांच्या दुकानात काम करणारी महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 37 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 16 मार्च रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास गजानन नगर -काळेवाडी फाटा येथे घडली. आरोपी गिरीश भाटिया याचे दुकान फिर्यादी यांनी भाड्याने चालविण्यासाठी घेतले आहे. दुकानाचे भाड्याचे थकलेले 90 हजार रुपये मागण्याच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादी यांच्यासोबत वाद घातला.

त्यावेळी जातीवाचक शब्द वापरून फिर्यादी यांच्या अंगावर मारण्यासाठी आरोपी धावून गेले. तसेच फिर्यादी यांना शिवीगाळ करत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.