Wakad crime News : सोसायटीची सव्वा कोटींची फसवणूक; चेअरमनसह तिघांविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – वाकड येथील ड्यु-डेल सोसायटीमधील पाच गाळ्यांच्या बांधकामाचे काम बालाजी असोसिएटस् यांना दिले होते. यापैकी तीन गाळे सोसायटीला तर दोन गाळे बालाजी असोसिएटसला मिळणार होते. या गाळयाच्या बांधकामाचा खर्च वजा करुन सोसायटीला 1 कोटी 25 लाख रुपये मिळणार होते. मात्र, सोसायटीचे चेअरमन यांनी बालाजी असोसिएटसच्या मालकांकडून 1 कोटी 25 लाख रुपये स्वत:च्या खात्यावर जमा करून घेतले तसेच सोसायटीच्या मालकीचे तीन गाळे सोसायटीला विश्वासात न घेता परस्पर बालाजी असोसिएटला विकून सोसायटीची फसवणूक केली.

या प्रकरणी सोसायटीच्या सेक्रेटरी स्वाती प्रशांत भट्ट ( वय 39, रा. ड्यु-डेल सोसायटी, वाकड ) यांनी शुक्रवारी (दि.18) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार सुदेश सुधाकर राजे ( वय 51, रा. वाकड, पुणे ), शिवदास पंडित कलाटे ( वय 36, वाकड पुणे) व सुरेश बापू विनोदे (वय 51, वाकड पुणे ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी स्वाती भट्ट या डयु-डेल सोसायटीच्या सेक्रेटरी आहेत, तर आरोपी सुदेश राजे हे या सोसायटीचे चेअरमन आहेत,, आरोपी शिवदास कलाटे व सुरेश विनोदे हे बालाजी असोसिएटचे मालक आहेत.

डयु-डेल सोसायटीने गाळा क्रंमाक सहा ते दहा पर्यंतच्या गाळ्यांचे बांधकाम करण्याचे काम बालाजी असोसिएटस् यांना दिले होते.

या पाच गाळ्यांपैकी लहान आकाराचे तीन गाळे सोसायटीला व मोठया आकाराचे दोन गाळे बालाजी एसोसिएटस् मिळणार होते. या गाळयाच्या बांधकामाचा खर्च वजा करुन सोसायटीला 1 कोटी 25 लाख रुपये सोसायटीला मिळणार होते.

सोसायटीचे चेअरमन आरोपी सुदेश राजे यांनी बालाजी असोसिएटचे शिवदास कलाटे व सुरेश विनोदे यांना सोसायटीचे खोटे पत्र देऊन त्या आधारे बालाजी असोसिएटकडून वैयक्तिक खात्यावर पैसे घेऊन सोसायाटीची फसवणूक केली. तसेच या कामाकरिता शिवदास कलाटे व सुरेश विनोदे यांनी मदत केली.

तसेच, आरोपी सुदेश राजे याने सोसायटीच्या मालकीचे तीन गाळे सोसायटीला विश्वासात न घेता परस्पर बालाजी असोसिएटला विकून सोसायटीची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.