Wakad Crime News : टेम्पोसह 34 लाख 25 हजारांचा गुटखा जप्त

सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई

एमपीसी न्यूजपिंपरीचिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांनी वाकड येथे निपाणीहून नाशिककडे निघालेल्या टेम्पोला पिंपरीचिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने वाकड परिसरात सापळा लावून पकडले. त्या टेम्पोमध्ये तब्बल 25 लाख रुपयांचा गुटखा असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी टेम्पोसह 34 लाख 25 हजार 400 रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. ही कारवाई मंगळवारी (दि.15) थेरगाव फाटा चौक, वाकड येथे करण्यात आली.

झुबेर लियाकत बाडीवाले (वय 25, रा. सावंतवाडी, सिंधुदुर्ग), शमशुद्दीन शेख (वय 39, रा. अंधेरी रोड, मुंबई) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आहेत. याबाबत पोलीस नाईक नितीन लोंढे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निपाणी येथून नाशिककडे एका आयशर टेम्पोमधून प्रतिबंधित गुटखा नेला जात असल्याची माहिती पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी वाकड येथे थेरगाव फाटा चौकात सापळा लावला. सकाळी अकरा वाजताच्या सुमारास पोलिसांनी एका आयशर टेम्पोला अडवून झडती घेतली. त्यामध्ये तब्बल लाखो रुपयांचा प्रतिबंधित पान मसाला, तंबाखू गुटखा आढळून आला.

पोलिसांनी टेम्पोसह 34 लाख 25 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींनी टेम्पोमध्ये एक तलवार ठेवली असल्याचेही पोलीस तपासात उघडकीस आले आहे. पोलिसांनी याबाबत देखील गुन्ह्यात कलमवाढ केली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.