Wakad Crime News : आई-वडिलांच्या जमिनीत हिस्सा मागत विवाहितेचा छळ; पती, सासऱ्यावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – आई वडिलांच्या शेतीमध्ये हिस्सा मागून तो देण्यास नकार दिल्याने पती आणि सास-याने मिळून विवाहितेचा छळ केला. तसेच विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला लाकडी बॅटने मारहाण केल्याची तक्रार वाकड पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. हा प्रकार सन 2007 पासून 4 डिसेंबर 2021 या कालावधीत काळेवाडी येथे घडला.

पती नागनाथ ढाळे (वय 44), सासरे अंकुश नामदेव ढाळे (वय 65, रा. काळेवाडी, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी 41 वर्षीय विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सन 2007 ते 4 डिसेंबर 2021 या कालावधीत आरोपींनी फिर्यादी विवाहितेकडे वारंवार पैशांची मागणी केली. विवाहितेच्या आई वडिलांच्या शेतीमध्ये हिस्सा मागून तो देण्यास नकार दिला असता आरोपींनी विवाहितेला शिवीगाळ, मारहाण करून घटस्फोट देण्याची धमकी देत तिचा शारीरिक व मानसिक छळ केला.

30 नोव्हेंबर 2021 रोजी पतीने विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन शिवीगाळ करून लाकडी बॅटने मारहाण केली. सास-याने शिवीगाळ करून ‘तू आमच्या घरातून निघून जा’ असे म्हणून स्टीलच्या टाकीवरील झाकणाने मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.