Wakad Crime News : पतीचे कर्ज फेडण्यासाठी माहेरहून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज – पतीचे कर्ज फेडण्यासाठी माहेराहू दोन लाख रुपये आणावेत अशी मागणी सासरच्या मंडळींनी विवाहितेकडे केली. यावरून विवाहितेचा वेळोवेळी छळ करण्यात आला. ही घटना 2015 ते 26 जुलै 2021 या कालावधीमध्ये वारुंजी फाटा, कराड येथे घडली.

पती राजेंद्र एकनाथ कारंडे, सासू व नणंद (तिघेही रा. वारुंजी फाटा, ता. कराड, जि. सातारा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित विवाहितेने सोमवारी (दि. 26) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या सासरी नांदत असताना पती राजेंद्र कारंडे, सासू आणि नणंद यांनी आपसात संगनमत करुन फिर्यादी यांनी माहेराहून पतीचे कर्ज फेडण्यासाठी दोन लाख रुपये आणावेत अशी मागणी केली. त्यासाठी वेळोवेळी तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. याबाबत विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.