Wakad crime News : फ्लॅटचे हप्ते भरण्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज – पती-पत्नीच्या नावावर घेतलेल्या फ्लॅटचे हप्ते भरण्याच्या कारणावरून पती, सासू आणि नणंदेने विवाहितेचा छळ केल्याची फिर्याद वाकड पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. हा प्रकार वाकड परिसरात घडला.

पती गणेश चंद्रकांत भांगरे (वय 31), सासू शोभा गणेश भांगरे, नणंद सोनाली सातपुते (तिघे रा. रहाटणी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पीडित विवाहीतेने सोमवारी (दि. 26) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी पीडित विवाहितेला वारंवार घरगुती कारणावरून मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच विवाहिता आणि तिचा पती या दोघांच्या नावावर घेतलेल्या फ्लॅटचे हप्ते भरण्याच्या कारणावरून आरोपींनी विवाहितेचा शरीरिक व मानसिक छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

वाकड पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.