Wakad Crime News : उसने पैसे दिले नाहीत म्हणून मित्राने फोडल्या मित्राच्या डोक्यात बिअरच्या बाटल्या

एमपीसी न्यूज – उसने पैसे दिले नाहीत म्हणून पैसे मागणा-या मित्राने दुस-या मित्राच्या डोक्यात बिअरच्या बाटल्या फोडल्या. तसेच चाकूने वार करून गंभीर जखमी केले. ही घटना शनिवारी (दि. 10) रात्री अकरा वाजता कावेरी नगर येथे घडली.

बलवीर मुन्ना रजक (वय 25, रा. निगडी पुलाजवळ, पुणे. मूळ रा. मध्य प्रदेश) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याबाबत रविवारी (दि. 11) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मातादीन रजक (रा. पडवळनगर, थेरगाव) आणि त्याच्या दोन अनोळखी साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शनिवारी रात्री अकरा वाजता कावेरीनगर येथील सचिन वाईन्स या दुकानासमोरून जात होते. दुकानासमोर फिर्यादी यांच्या गावाकडील मित्र आरोपी मातादीन बसला होता. मातादिन याने फिर्यादीकडे उसने पैसे मागितले. फिर्यादीने पैसे दिले नाहीत. त्यावरून चिडून मातादिन याने फिर्यादी यांच्या डोक्यात दोन बिअरच्या बाटल्या मारून जखमी केले.

त्यानंतर मातादिन याच्या दोन साथीदारांनी फिर्यादी यांच्या हातावर धारदार शस्त्राने वार केले आणि आरोपी पळून गेले.

वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.