Wakad Crime News : फ्रिज , टीव्ही आणि एसीसाठी विवाहितेचा छळ 

एमपीसी न्यूज – फ्रिज , टीव्ही आणि एसीची मागणी करत सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ केल्याची फिर्याद वाकड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार सासरच्या चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

पती विनायक गजानन गरुडे (वय 30), सासरे गजानन खंडू गरुडे, सासू सुनीता गजानन गरुडे, पतीचे मामा सुनील वायकर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पिडीत विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सासरच्या मंडळींनी विवाहितेकडे वारंवार फ्रिज , कलर टीव्ही आणि एसीची मागणी केली. त्यासाठी विवाहितेने नकार दिला असता सासरच्या मंडळींनी विवाहितेला वारंवार शिवीगाळ व मारहाण करून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.