Wakad Crime News : सराईत गुन्हेगार शुभम कवठेकर टोळीवर मोका अंतर्गत कारवाई

एमपीसी न्यूज – दरोडा टाकणे, शस्त्रांचा धाक दाखवून खंडणी घेणे, खूनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत यासारखे गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगार शुभम कवठेकर टोळीवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. टोळीप्रमुख शुभम कवठेकरसह इतर सात जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

याप्रकरणी टोळीप्रमुख शुभम निवृत्ती कवठेकर (वय 23, बिबवेवाडी, पुणे), दिपक नाथा मिसाळ (वय 23, रा. काळेवाडी, पुणे), आकाश महादेव कांबळे ( वय 22, रा. रहाटणी पुणे), कैलास हरिभाऊ वंजारी (वय 19, रा. रहाटणी पुणे), मंगेश मोतीराम सपकाळ (वय 23, रा. काळेवाडी, पुणे), सनी गौतम गवारे (वय 19, गजानन नगर सी. कॉलनी, रहाटणी), यांच्यावर पिंपरी चिंचवड पोलिसांनी कारवाई केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम निवृत्ती कवठेकर आणि इतर आरोपी हे वर्चस्वासाठी व आर्थिक फायद्यासाठी टोळी बनवून वैयक्तीतरित्या अथवा संघटितपणे दरोडा टाकणे, शस्त्रांचा धाक दाखवून खंडणी घेणे, खूनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत यासारखे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

हि कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त, कृष्णप्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त सुधीर हिरेमठ, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-2 आनंद भोईटे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-2 प्रेरणा कट्टे, यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक राजकुमार शिंदे, वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर तसेच, पोलीस हवालदार सचिन चव्हाण, पोलीस हवालदार सुहास पाटोळे यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.