Wakad Crime News : महिलेचा विनयभंग, घरमालकास मारहाण, मुलीला धक्काबुक्की; आरोपी जेरबंद

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – महिलेचा पाठलाग करून तिच्याशी सलगी करण्याचा तरुणाने प्रयत्न केला. तिच्या घराचा दरवाजा वाजवून पळून जात असताना सर्वांनी पाहिले. त्यावेळी त्याला जाब विचारला असता त्याने महिलेला शिवीगाळ, मारहाण करून तिचा विनयभंग केला. घरमालकाला शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच घरमालकाच्या मुलीचे केस धरून तिलाही धक्काबुक्की केली.

हा प्रकार मंगळवारी (दि. 4) मध्यरात्री वाकड परिसरात घडला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

आकाश हरिश्चंद्र कोपनर (वय 27, रा. थेरगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत 25 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाशने फिर्यादी यांचा वारंवार पाठलाग करून त्यांच्यासोबत सलगी करण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी पहाटे फिर्यादी आणि त्यांचा लहान मुलगा घरी झोपलेले असताना आरोपीने त्यांचा दरवाजा वाजवला आणि तो पळून गेला.

पळून जाताना फिर्यादी आणि त्यांच्या घरमालकाच्या संपूर्ण कुटुंबाने त्याला पाहिले. त्याबाबत आरोपीला जाब विचारला असता त्याने फिर्यादी यांना शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच घरमालकाला शिवीगाळ करून मारहाण केली. घरमालकाच्या मुलीचे केस पकडून तिच्याशी धक्काबुक्की करून तिचा विनयभंग केला.

याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

वाकड पोलीस तपास करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.