Wakad Crime News : मैत्रिणीला दवाखान्यात घेऊन जाणाऱ्या तरुणीचा विनयभंग; एकास अटक

एमपीसी न्यूज – आजारी असलेल्या मैत्रिणीला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी आलेल्या मैत्रिणीला आणि तिच्या भाऊ व मित्राला एकाने मारहाण केली. तसेच तरुणीचा विनयभंग केला. याबाबत एकाला अटक करण्यात आली आहे. ही घटना रविवारी (दि. 28) रात्री वाकड चौक, वाकड येथे घडली.

दादा संपत कलाटे (वय 31, रा. वाकड चौक, वाकड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित तरुणीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी, त्यांचा भाऊ नितेश आणि डॉ. घनश्याम दुधात्रा असे तिघेजण फिर्यादी यांच्या आजारी मैत्रिणीला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी रविवारी रात्री अकरा वाजता मैत्रिणीच्या घरी गेले.

त्यावेळी आरोपीने फिर्यादी यांना रोखून आजारी मैत्रिणीला दवाखान्यात घेऊन जाण्यास मज्जाव केला. फिर्यादी यांच्याशी गैरवर्तन करून त्यांचा विनयभंग केला. तसेच त्यांचा भाऊ आणि आजारी मैत्रिणीच्या मित्राला मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.