Wakad Crime News : दारू प्यायला पैसे न दिल्याने पत्नीच्या डोक्यात हातोडीने मारत खुनी हल्ला; मुलीची फिर्याद

एमपीसी न्यूज – दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने पत्नीच्या डोक्यात हातोडीने वार करून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी महिलेच्या पती विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ही घटना गुरुवारी (दि. 23) रात्री इंद्रायणी नगर, सदगुरु कॉलनी, थेरगाव येथे घडली.

सुनिता बाळासाहेब जाधव असे जखमी महिलेचे नाव आहे. सुनिता जाधव यांच्या मुलीने याप्रकरणी रविवारी (दि. 26) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बाळासाहेब किसन जाधव (रा. इंद्रायणी नगर, सद्गुरू कॉलनी, थेरगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बाळासाहेब जाधव हा फिर्यादीचा पिता आहे. तर जखमी सुनिता जाधव या फिर्यादीच्या आई आहेत. आरोपी बाळासाहेब याला दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून त्याने त्याचा राग मनात धरला. त्यातून सुनीता जाधव यांच्या डोक्यात तीन ते चार वेळा हातोडीने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यात सुनिता जाधव जखमी झाल्या आहेत. घटनेनंतर आरोपी बाळासाहेब जाधव पळून गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.