Wakad Crime News : डोक्यावर कठीण वस्तूने मारून कवटी फोडून तरुणाचा खून

एमपीसी न्यूज – डोक्यावर कठीण वस्तूने मारून कवटी फोडून तरुणाचा खून केल्याची धक्कादायक घटना डांगे चौक, वाकड येथे उघडकीस आली. ही घटना गुरुवारी (दि. 23) सकाळी उघडकीस आली आहे.

रोहन दिलीप कांबळे (वय 30, रा. चांदणी चौक, धायरीगाव, पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी दिलीप शंकर कांबळे (वय 60, रा. चांदणी चौक, धायरीगाव, पुणे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास मृत रोहन कांबळे डांगे चौकाजवळ असलेल्या एका दारूच्या दुकानात दारू प्यायले. तिथून बाहेर आल्यानंतर रात्रीच्या वेळी त्यांच्या डोक्यात अज्ञात व्यक्तीने कठीण वस्तूने मारले. त्यामध्ये रोहन यांच्या डोक्याची कवटी फुटली आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. गुरुवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.

त्यानंतर रोहन यांना वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र सकाळी अकरा वाजताच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.