Chakan Crime News : टँकर पुरविण्याच्या कारणावरुन व्यावसायिकाचा खून करणारे नऊ आरोपी जेरबंद

महाळुंगे पोलीस, क्राईम युनिट तीन व भोसरी पोलिसांची संयुक्त कारवाई

एमपीसी न्यूज – कंपनीत पाण्याचा टँकर पुरविण्याच्या कारणावरुन एका व्यावसायिकाचा खून करणाऱ्या नऊ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. महाळुंगे पोलीस, क्राईम युनिट तीन आणि भोसरी पोलीस यांनी ही संयुक्त कारवाई केली आहे.

अक्षय अशोक शिवळे (वय 25, रा. महाळुंगे, खेड), दिपक बाळू पिंजण (वय 25, रा. महाळुंगे ), वैभव उर्फ सोन्या अरुण खोंडगे (वय 22, रा महाळुंगे), गौरव गजानन मुळे (वय 23, रा. महाळुंगे), विनोद उर्फ सोन्या गणेश पवार (वय 19, रा. शेलु ठाकरवाडी), आकाश उर्फ गण्या रवी धरमाळे (वय 19, रा. महाळुंगे), ऋषिकेश उर्फ गोटया सुनिल भालेराव (वय 20, रा. महाळुंगे), अभिषेक बुध्दसेन पांडे (वय 19, रा. खालुंब्रे, ता. खेड) व अनिल शांताराम शिंदे (वय 22, रा. आडे, ता. खेड) अशी अटक आरोपींची नावे आहेत. या सर्व आरोपींना 27 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाळुंगे-इंगळे (ता. खेड) याठिकाणी 14 मे रोजी अतुल तानाजी भोसले (वय 26, रा. महाळुंगे, ता. खेड) याच्यावर लोखंडी कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले होते. कंपनीत पाण्याचा टँकर पुरविण्याच्या कारणावरुन महाळुंगे गावातील तरुणांनी त्याच्यावर वार केल्याचे निष्पन्न झाले. तर 15 मे रोजी अतुल भोसले याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

पोलिसांनी या गुन्ह्यातील आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणांहून अटक केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.