Wakad Crime News : किरकोळ कारणावरून एकास मारहाण; कारची तोडफोड

एमपीसी न्यूज – एका तरुणाचे आणि तरुणीचे भांडण झाले. त्यामुळे तरुणीच्या मित्र आणि मैत्रिणींनी तरुणीला आपल्यासोबत नेले. त्यावेळी भांडण करणाऱ्या तरुणाने एकास मारहाण केली. त्यानंतर कारची तोडफोड केली. ही घटना सोमवारी (दि. 27) रात्री विवेकानंद नगर, वाकड येथे घडली.

अमरनाथ काशिनाथ ढोणे (वय 37, रा. भुजबळ चौक, वाकड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आमिर खलील खान (वय 26, रा. विवेकानंद नगर, वाकड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आमिर आणि फिर्यादी यांची मैत्रीण पूजा सिंग या दोघांचे सोमवारी रात्री भांडण झाले. त्यानंतर फिर्यादी आणि त्यांच्या दोन मैत्रिणी मिळून पूजाला त्यांच्यासोबत घेऊन जात होते. त्यावेळी आरोपी तिथे आला. त्याने फिर्यादी यांना सिमेंटचा गट्टू डोक्यात मारून जखमी केले. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. फिर्यादी यांच्या कारच्या काचा फोडून कारचे नुकसान केले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.