Wakad Crime News : अगरबत्ती बनविण्याची मशीन विकण्याच्या बहाण्याने एक लाखाची फसवणूक

एमपीसी न्यूज – अगरबत्ती बनविण्याची मशीन विकत देण्याच्या बहाण्याने एका तरुणाची एक लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 5 ते 19 एप्रिल या कालावधीत काळेवाडी येथे घडली.

_MPC_DIR_MPU_II

खुशालो राहूल विश्‍वकर्मा (वय 25, रा. विजयनगर, काळेवाडी) यांनी सोमवारी (दि. 10 मे) याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कुलदीप सिंग (रा. उत्तर प्रदेश) याच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कुलदीप सिंग याने आपल्या यू-ट्युब चॅनेलवर अगरबत्ती बनविण्याच्या मशिनची जाहीरात दाखविली. ही मशिन फिर्यादी विश्‍वकर्मा यांना विक्री करून ती घरपोच देण्याचे अमिष दाखविले. त्यानुसार विश्‍वकर्मा यांनी त्यास 9 एप्रिल रोजी दहा हजार रुपये ऑनलाइन पाठविले. असे वेळोवेळी आरोपी कुलदीप सिंग याने फिर्यादी विश्‍वकर्मा यांच्याकडून एक लाख रुपये घेतले. तसेच मशिन न पाठविता किंवा पैसे परत न करता एक लाख रुपयांची फसवणूक केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.