Wakad Crime News : अज्ञात वाहनाखाली सापडून पादचारी ठार

एमपीसी न्यूज – रस्त्याने पायी चालत जात असताना अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यानंतर वाहन अंगावरून गेल्याने पादचारी व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. 24) सकाळी आठ वाजता रहाटणी येथील लुणावत हॉस्पिटल समोर घडली.

नवनाथ ढेपे (रा. रहाटणी. मूळ रा. लाखनगाव, ता. वाशी, जि. उस्मानाबाद) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत अक्षय नवनाथ ढेपे (वय 22) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अक्षय यांचे मयत वडील नवनाथ ढेपे बुधवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास रहाटणी येथील लुणावत हॉस्पिटल समोरून रस्त्याने पायी चालत जात होते. त्यावेळी अज्ञात वाहनाने त्यांना जोरात धडक दिली. त्यात ते रस्त्यावर पडले. त्यानंतर वाहन अंगावरून गेल्याने गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळी न थांबता पळून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.