Wakad Crime News : पादचारी तरुणाला दोन चोरट्यांनी लुटले

एमपीसी न्यूज – कंपनीच्या बसमधून उतरून रस्त्याने पायी चालत जात असलेल्या एका तरुणाला दोघांनी मिळून लुटले. यात चोरट्यांनी मोबाईल फोन आणि रोख रक्कम जबरदस्तीने चोरून नेली. ही घटना रविवारी (दि. 29) मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास डॉ. अटकर यांच्या क्लिनिकसमोर काळेवाडी येथे घडली.

सुनील रामचंद्र बुरंगले (वय 27, रा. काळेवाडी, मूळ रा. चिकमहुद, ता. सांगोला, जि. सोलापूर) यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रविवारी रात्री कंपनीच्या बसमधून उतरून पायी चालत घरी जात होते. काळेवाडी येथे डॉ. आटकर यांच्या क्लिनिकसमोर फिर्यादी आले असता एका दुचाकीवरून दोघेजण आले. त्यातील एकाने दुचाकी फिर्यादी यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. तर दुस-याने फिर्यादी यांच्या खिशातील पाकीट काढून त्यातील 600 रुपये रोख रक्कम आणि 10 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जबरदस्तीने काढून चोरून नेला. पोलीस उपनिरीक्षक आर. आर. दिवटे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.