Wakad Crime News : कस्पटे वस्ती येथील ग्रीन व्हिलेज स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; वेश्या व्यवसायातून चार महिलांची सुटका

एमपीसी न्यूज – कस्पटे वस्ती, वाकड येथे ग्रीन व्हिलेज स्पा सेंटरमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू होता. याबाबत माहिती मिळाल्यानंतर सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई करून वेश्या व्यवसायातून चार महिलांची सुटका केली. ही कारवाई शुक्रवारी (दि. 17) रात्री करण्यात आली.

स्पा सेंटर मॅनेजर दीपक नामदेव साळुंके (वय 24, रा. कस्पटे वस्ती, वाकड. मूळ रा. धुळे) आणि अमित विश्वनाथ काटे (वय 32, रा. पिंपळे सौदागर, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्पा सेंटर मॅनेजर दीपक याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक धैर्यशील सोळंके यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कस्पटे वस्ती, वाकड येथे ग्रीन व्हिलेज स्पा या स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार शुक्रवारी रात्री साडेसात वाजताच्या सुमारास स्पा सेंटरवर छापा मारून कारवाई करण्यात आली.

आरोपी चार महिलांना पैशांचे अमिश दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत होते. वेश्या व्यवसायातून मिळालेल्या पैशातून आरोपी आपली उपजीविका भागवत होते. पोलिसांनी कारवाई करत चार महिलांची सुटका केली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.