Wakad Crime News : स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा

दोन महिलांची सुटका

0

एमपीसी न्यूज – गजानननगर, काळेवाडी फाटा येथे स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी छापा मारला. यामध्ये दोन महिलांची सुटका करण्यात आली आहे. तर स्पा सेंटर मॅनेजर आणि स्पा मालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 10) दुपारी तीन वाजताच्या सुमारास करण्यात आली.

स्पा मॅनेजर अनिल अरुण जेना (वय 26, रा. गुजरनगर, थेरगाव), स्पा मालक गणेश कदम (रा. इंदापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. आरोपी अनिल याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत एका महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी दोन महिलांना जबरदस्तीने वेश्याव्यवसायासाठी प्राप्त केले. त्यांना पैशांचे आमिष दाखवून स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली असता पोलिसांनी स्पा सेंटरवर छापा मारला.

या कारवाईमध्ये 11 हजार 20 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करत दोन महिलांची सुटका केली. तर एका आरोपीला अटक केली असून दुसर्‍याचा शोध सुरू आहे.

वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment