Wakad Crime News : क्राईम ब्रांचचे पोलीस असल्याची बतावणी करून महिलेच्या गळ्यातील दीड लाखांची सोन्याची माळ चोरली 

एमपीसी न्यूज – क्राईम ब्रांचचे पोलीस असल्याची बतावणी करून वृद्ध महिलेच्या गळ्यातील एक लाख 60 हजारांची सोन्याची माळ तीन चोरटयांनी चोरून पळवून नेली. हा प्रकार मंगळवारी (दि. 23) सकाळी थेरगाव येथे घडला. 

फुलाबाई जगन्नाथ पाटील (वय 73, रा. थेरगाव) यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास फिर्यादी पाटील थेरगाव येथील सध्रुव कॉम्प्लेक्स येथून पायी चालत जात होत्या. त्यावेळी एकजण  पाटील यांच्याजवळ आला. ‘आमच्या साहेबांनी बोलावले आहे’ असे सांगून त्या व्यक्तीने दुस-या व्यक्तीकडे नेले.

तिस-या व्यक्तीने ‘आम्ही क्राईम ब्रांचचे पोलीस आहे. आम्हाला संरक्षणाकरिता नेमलेले आहे’ असे म्हटले. पाटील यांना त्यांच्या गळ्यातील सोन्याची 40 ग्रॅम वजनाची एक लाख 60 हजारांची माळ काढण्यास सांगितले.

पाटील त्यांच्या गळ्यातील सोन्याची माळ काढत असताना ती केसात अडकली. त्यावेळी एका आरोपीने ती काढून पाटील यांच्या बॅगमध्ये ठेवल्याचा बहाणा केला. त्यानंतर चोरटे पाटील यांची सोन्याची माळ घेऊन दुचाकीवरून पळून गेले.

वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.