Wakad Crime News : वाकड, तळेगावात दोन ठिकाणी जुगार अड्यांवर छापे

एमपीसी न्यूज – वाकड येथे मटका जुगारावर तर शंकरवाडी सोमाटणे येथे रम्मी जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापे मारून कारवाई केली. दोन्ही कारवायांमध्ये पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाया रविवारी (दि. 19) करण्यात आल्या.

वाकड पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई विक्रम भगत यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुरज मछिंद्र जाधव (वय 21, रा. काळेवाडी, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डांगे चौक वाकड येथे आरोपी सुरज मटका जुगार घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी रविवारी रात्री साडेसात वाजता छापा मारून कारवाई केली. या कारवाईमध्ये पोलिसांनी 10 हजारांचा मोबाईल फोन, 900 रुपये रोख रक्कम जप्त केली आहे.

पोलीस कॉन्स्टेबल विकास तारू यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रवींद्र विठ्ठल दाभाडे (वय 29, रा. तळेगाव दाभाडे), संजय शाम वाजे (वय 28, रा. शेलारवाडी), महेश रमेश आरसडे (वय 32, रा. शेलारवाडी), विक्रम तानाजी राऊत (वय 30, रा. मामुर्डी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शंकरवाडी सोमाटणे येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये तीनपानी पत्त्याच्या जुगारावर पैसे लावून खेळत होते. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करून चौघांवर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी जुगाराची साधने आणि तीन हजार 300 रुपये रोख रक्कम जप्त केली आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.