Wakad Crime News : मित्राच्या मनोरुग्ण पत्नीवर बलात्कार; आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज – सुरक्षा रक्षक म्हणून काम करणा-या सहकारी मित्राच्या मनोरुग्ण पत्नीवर बलात्कार केला. याप्रकरणी आरोपी मित्राला अटक करण्यात आली आहे. ही घटना 26 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत वाकड परिसरात घडली.

किशोर दिनकर सूर्यवंशी (वय 30, रा. थेरगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचा पती आणि आरोपी एकाच ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. आरोपीने मित्र रात्री झोपी गेल्यानंतर त्याच्या मोबईल फोनवरून त्याच्या पत्नीला फोन करून घराचा दरवाजा उघडण्यास सांगितले. पतीच्या मोबईलवरून फोन आल्याने पीडित महिलेने दरवाजा उघडा ठेवला.

त्यानंतर रात्री घरात घुसून पीडित महिला मनोरुग्ण असल्याचे माहिती असूनही आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. तसेच आरडाओरडा केल्यास मारून टाकीन, अशी धमकी दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.