Wakad Crime News : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार

एमपीसी न्यूज – लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणाने तरुणीवर वारंवार बलात्कार केला. तरुणीने लग्न करण्याबाबत विचारले असता तरुणाने नकार दिला. हा प्रकार ऑगस्ट 2018 ते 13 मार्च 2021 या कालावधीत पडवळनगर थेरगाव, पिंपळे सौदागर येथील गार्डनमध्ये आणि रावेत येथील हग्ज विथ मग्ज कॅफेमध्ये घडला आहे.

श्रीसैल शिवा कांबळे (वय 23, रा. पडवळनगर, थेरगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पिडीत तरुणीने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी श्रीसैल याने पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले. त्यातून तिला ठिकठिकाणी नेऊन तिच्यावर वारंवार शारीरिक संबंध ठेवले. तरुणीने त्याला लग्न करण्याबाबत विचारले असता त्याने तरुणीला शिवीगाळ करून लग्नास नकार दिला.

तरुणीने याबाबत सातारा जिल्ह्यातील वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. त्यानंतर वडूज पोलिसांनी हा गुन्हा वाकड पोलिसांकडे वर्ग केला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.